UPCOMING EVENTS

Written Testimonials

Video Testimonials

आपला कार्यक्रम खूप छान मुलांना प्रोत्साहन देणारा आहे. आमच्या सारख्या सामाजिक कार्यकरीत असलेल्या संस्थांना मुलांच्या माध्यमातून गाव विकासासाठी कार्य करणे यामुळे सुलभ जाईल, आपल्या या ५० व्या उपक्रमासाठी मनापासून खूप शुभेच्छा !

परिवर्तन महिला संस्था

अध्यक्ष
हरी ओम आपला हा उपक्रम नावाला साजेसा आहे. सर्व कार्यकर्ते कर्तव्य पार पाडत आहेत. त्यातून आपल्या गावात परिवर्तन घडवत आहे ह्यातून राष्ट्र बलवान होईल हि भावना दृढ धरा. आपल्या कार्याला अनेक अनेक शुभेच्छा!

भारती खातोळकर

मनशक्ती साधन
हा कार्यक्रम खूप छान वाटला आमची मूल यामुळे पुढे जातील. सर्वांसाठी शुभेच्छा.

लता प्रताप राऊत

मोराडा ग्रामपंचायत , सरपंच
दिनांक २७/०५/२०१७ मी श्री आडवडे अमित तुकाराम मु. पो. रामपूर (तांबो) ता. चिपळूण चा रहिवाशी आज कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट च्या विविध शैक्षणिक साहित्य वस्तू वाटप कार्यक्रम ५० वा कार्यक्रमास उपस्थित राहिलो विद्यार्थीप्रति अतूट प्रेम व त्यांना दिलेल्या विविध वस्तू हे पाहून अत्यंत भारहून गेलो अगदी नीटनेटका संयोजनबद्ध कार्यक्रमाने तर मला आश्चर्य वाटले असे अवघड समाजकार्य आपण करत आहात त्याबद्दल आभार आणि खूप खूप भविष्यासाठी शुभेच्छा! धन्यवाद!

श्री आडवडे अमित तुकाराम

दिनांक २७/०५/२०१७ कर्त्यव्य चॅरिटेबल ट्रस्ट चा विविध शैक्षणिक साहित्य व वस्तू वाटप कार्यक्रम ५० वा हा अत्यंत स्तुत्य व नावाप्रमाणे आहे. विद्यार्त्यांना साहित्य वाटप करताना घेतलेले उपक्रम वाक्यंणाजोगे होते त्यातून विद्यार्थ्यांचे विविध सुप्त गुण कौशल्य विकसित होऊन शैक्षणिक प्रगतीसाठी मदत करणारे ठरतील यात तिळमात्र शंका येतच नाही. या सर्व उपक्रमांती मी खूप खूप भारावून गेलो असे कार्य उत्त्तरोत्तर आपल्या हातून भविष्यात घडण्यासाठी मी अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो. आपले मनापासून आभार.

श्री अमित आडवडे

महराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी, संघटना ता. चिपळूण अध्यक्ष
दिनांक २९/०७/२०१७ रोजी चेम्बुर मराठी शाळेमध्ये कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्टद्वारा सबका मलिक एक फॉऊंडेशन या संस्थेच्या मुलामुलींना शैक्षणिक भेटवस्तू उपक्रम राबिवण्यात आला या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन तसेच या कार्यक्रमात चित्रकला, हस्तकला, वेशभूषा, गाणे, वक्तृत्व स्पर्धा, नाटक हे कार्यक्रम राबिवल्यामुळे सर्व मुलामुलींना प्रोत्साहन मिळाले. कर्तव्य ट्रस्टच्या सर्व टीम ने पूर्ण मेहनत, सेवा केल्या बद्दल धन्यवाद!

संचित धनावडे

दिनांक २९/०७/२०१७ रोजी चेम्बुर मराठी शाळेमध्ये कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्टद्वारा सबका मलिक एक फॉऊंडेशन या संस्थेच्या मुलामुलींना शैक्षणिक भेटवस्तू उपक्रम राबिवण्यात आला या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन तसेच या कार्यक्रमात चित्रकला, हस्तकला, वेशभूषा, गाणे, वक्तृत्व स्पर्धा, नाटक हे कार्यक्रम राबिवल्यामुळे सर्व मुलामुलींना प्रोत्साहन मिळाले. कर्तव्य ट्रस्टच्या सर्व टीम ने पूर्ण मेहनत, सेवा केल्या बद्दल धन्यवाद!

रोहिदास केदारे

सबका मलिक एक फॉऊंडेशन
दिनांक १२ ऑगस्ट २०१७ रोजी कर्त्यव्य चॅरिटेबल ट्रस्ट चा ५४ व कार्यक्रम आपण आमच्या श्री गगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था संचालित एकलव्य प्राथमिक व माध्यमिक हिरडपाडा ता. जव्हार जि. पालघर या दुर्गम आदिवासी भागात रबीवाला खार तर आमच्या विद्यार्थ्यांसाठी आगळा वेगळा उपक्रम ठरला चित्रकला स्पर्धेतून विद्यार्त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला, चाचणी मधून विद्यार्त्यांची स्पर्धा तसेच परीक्षेची पूर्वतयारी झाली, वेशभूषा व इंग्रजी कविता या स्पर्धेतून विविध महापुरुष कोळी बांधव पारंपरिक आदिवासी वेशभूषा यामुळे आम्ही व आमचे विद्यार्थी भारावून गेलो.शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला.कर्तव्य ट्रस्ट ने दाखून दिले कि All Power Within Students Can Do Anything & Everything आपल्या स्पर्धेतून शिक्षण व मनोरंजनातून शैक्षणिक प्रगती साधण्यात आली कर्तव्य ट्रस्ट चे जनरल मॅनेजर टीमचे प्रतिनिधी व स्वयंमसेवक यांनी उत्तम नियोजन व मेहनत करून कार्यक्रम यशस्वी केला. सर्व टीमचे आभार! आपण पुन्ना अश्याच प्रकारचे कार्यक्रम नेहमी शाळेत राबवलं हि अपेक्षा करतो. धन्यवाद!
आज दिनांक १२/०८/२०१७ रोजी कर्तव्य ट्रस्ट च्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रम विविध अंगानी भरलेला होत. यातील कार्यक्रमाच्या विविध प्रकारे विद्यार्त्यांनी केलेले सादरीकरण व सहभाग उल्लेखनीय होता. अश्या प्रकारच्या कार्यक्रमामुळे आदिवासी विद्यार्त्यांमध्ये आत्मविश्वास एक नवीन चेतना निर्माण होण्यास मोलाचे सहकार्य मिळाले. अश्या कार्यक्रमाचे आयोजन वारंवार करण्यात यावे. पुढील वाटचालीसाठी कर्त्यव्य ट्रस्टच्या सर्व सदस्यांना खूप खूप शुभेच्छा!

श्री एम. बी देवडे

जिल्हा परिषद शाळा, हिरडपाडा
आज शनिवार दिनांक १२/०८/२०१७ रोजी कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट चे पदकारी तसेच स्वयंसेवक या ठिकाणी एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा हिरडपाडा तालुका जव्हार जिल्हा पालघर इथे नियोजन प्रमाणे आले. शाळेने देखील कार्यक्रमाची पूर्ण तयारी केली होती प्रथम ईश्वराच्या आराधनेने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यामध्ये झाडांना भाऊ मानून त्यांना राखी बांधण्यात आल्या कर्तव्य संस्थेने झाडावरील प्रेमात वाढ केली आहे. पुढील कार्यक्रम चित्रकला, बुद्धिमत्ता चाचणी, वक्तृत्व्य स्पर्धा घेऊन विद्यार्त्यांचा कलागुणांना वाव दिली. विद्यार्त्यांचा आत्मविश्वास वाढवला. कर्तव्य चॅरिटेबल शालेय कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल खूप खप धन्यवाद!त्यांच्या पुढील कार्यक्रमांना शुभेच्छा!

श्री र.वि.मोदगे

प्राथमिक एकलव्य आश्रम शाळा
अभिप्राय दिनांक १२/०८/२०१७ रोजी गगनगिरी आश्रम शाळा इथे कर्तव्य ट्रस्ट ने घेतलेला कार्यक्रम खूप महत्व पूर्ण होता. आदिवासी भागात अश्याच कार्यक्रमाची गरज आहे आपण स्पर्धा व साहित्य वाटप हे शितू बांधकामात केलेला खारुताई वाटा मुलांना भावी काळासाठी प्रेरक उरेल असे मला वाटते. आपल्या कार्यक्रमाला जि.प. शाळा पोयशेत शाळेच्या शुभेच्छा आणि धन्यवाद!

पोयशेत मुख्याधापक

अभिप्राय दिनांक १२/०८/२०१७ शनिवार रोजी कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई मार्फत आमच्या शाळेत विविध प्रकारच्या कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन मोट्या उत्साहात करण्यात आले. या मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच परिसरातील जि. प. शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला व आमची व विद्यार्त्यांची माने जिंकली व प्रोत्साहित केले. आपण खूप खूप अनमोल कार्य करीत आहेत. Best of luck for your Brigitte Future

श्री जे. बी. नागर्जोजे

प्राथमिक शिक्षक, एकलव्य आश्रम शाळा, हिरडपाडा
अभिप्राय दिनांक १२/०८/२०१७ शनिवार हम सबको आगे बढना है! इसीलिये सबको पढना है! कर्तव्य ट्रस्ट चा सुंदर आणि प्रोत्साहन कार्यक्रम श्री गगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्थेच्या एकलव्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा हिरडपाडा येते राबवण्यात आला. सर्वप्रथम आपले आमच्या आदीवासी मुलानं कढून आभार! आपल्या वृक्ष राक्षबांधन, चित्रकला, अभियोग्यता चाचणी, बालविवाह, इंग्रजी कविता कविता गायन पार पडल्याने तसेच बक्षीस दिल्याने आमच्या विद्यार्त्यांचे प्रोतसाहन वाढले. आपला हा कार्यक्रम अतिशय छान असून खूप खूप आवडला! भविष्या करीता शुभेच्छा! धन्यवाद!

श्री पी.जी.पाटील

प्राथमिक शिक्षक
दिनांक १२/०८/२०१७ शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे या ओळी प्रमाणे आपल्या कार्यक्रमा मुले आमच्या अति दुर्गम आदिवासी भागात विद्यार्त्यांना शिक्षणाची आवड निर्माण होईल. व त्यांना इंग्रजी विषयात यश मिळेल त्यामुळे आपण अश्या प्रकारचे कार्यक्रम राबवावे हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो. व तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो.

श्री एन. डी. पाटील

प्राथमिक शिक्षक एकलव्य
कर्तव्य चारीटेबल मुंबई या संस्थेमार्फत जो कार्यक्रम घेण्यात आला तो फारच छान होता. यामध्ये विद्यार्त्यांच्या विविध स्पर्धा घेतल्या व मुलांना प्रोत्साहन दिले. तसेच खूप छान असे बक्षीस देण्यात आली. आदिवासी भागांमध्ये अस्या अनेक कार्यक्रमाची गरज आहे त्यातून हुशार व गुणवंत मुलांना पुढे जाण्यास चालना मिळेल. असा छान कार्यक्रम राबवल्या बद्दल खूप खुप आभार!

सौ. प्र मोहांडकर

शिक्षक भोताडपडा
दिनांक ०७/१०/२०१७ आज आमच्याकढे कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट अंधेरी मुंबई येथील सेवाभावी संस्थेकडून मुलांना मार्गदर्शनपर स्पर्धा घेतल्या तसेच मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. आज दाबोसा आश्रमशाळेच्या विद्यार्थी तसेच देव्हारे आश्रम शाळा, वेडोली माध्यमिक शाळा जि. प. शाळा दाबोसा, पिंपरूना व येथील मुलांना अतिशय नाविन्यपूर्ण रीतीने प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. संपूर्ण शाळा, पालक, पदाधिकारी व विद्यार्थी यांच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद!

मुख्याधापक

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दाबोसा
दिनांक १८/११/२०१७ शनिवार रोजी जि. प. शाळा कामण मराठी येथे कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे राबिवण्यात आलेला सहशालेय उपक्रम अतिशय स्तुत्य होता. विद्यार्त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे शैक्षणिक उपक्रम काव्यगायन, वेशभूषा,सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला व विद्यार्त्यांच्या बुद्धीला चालना देणारी अभियोग्यता चाचणी या विविध उपक्रमांनी विद्यार्त्यांच्या मनात नवीन प्रेरणा निर्माण केली. आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व होतकरू युवा वर्गाचे भरभरून कौतुक.

मुख्याधापक
दिनांक १८/११/२०१७ रोजी शाळेस भेट दिली कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट व आदिवासी एकटा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळा कामण मराठी येथे कामं केंद्रातील विद्यार्त्यांचे कलागुण शोधण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते. सादर कामात विद्यार्त्यांकडून चित्रकला स्पर्धे निमित्त त्यांच्या मनाप्रमाणे चित्र काढणे, बुद्धीला चालना देणारे उपक्रम या सारख्या विविध उपक्रमाचे आयोजन केले होते जेणेकरून विद्यार्त्यांचा सर्वागीण विकास साधता येईल. अशा या दोन्ही संस्थेमधील पदाधिकारी व सर्वाना माझ्या खूप खूप शुभेच्छा.

केंद्र प्रमुख कामण
आज दिनांक २ डिसेम्बर २०१७ रोजी मान ता. विक्रमगड, जिल्हा पालघर येतील कर्तव्य ट्रस्टचा कार्यक्रम पाहिला खूप छान वाटले आदिवासी मुलांमधील आत्मविश्वास जागृत करण्याचे अतिशय महत्वाचे काम कर्तव्य चे सर्व सहकारी कर्मचारी अतिशय मनापासून करीत होते. फारच वेगळे आनंददायी वातावरण होते. सुमारे ३००० पेक्षा जास्त विद्यार्थी असूनही कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्तम होते. कर्तव्य ट्रस्टला असे कार्यक्रम घेण्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

डॉ. हेमंत पेडणेकर

प्राचार्य
कर्तव्य चारीटेबल ट्रस्ट मार्फत पॅरोल व भाताने केंद्रातील एकूण ४० शाळांसाठी खोज एक उत्सव ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या बद्दल त्यांचे आभार. ह्या कार्यक्रमात दोन्ही केंद्रातील १३७१ विद्यार्त्यानी सहभाग घेतला खूप छान असे कार्यक्रम राबवण्यात आले होते त्या मुले मुलांचा उत्साह अगदी वाढला होता. खरच आम्ही खूप आभारी आहोत तुमचे.

केंद्र प्रमुख

केंद्रशाळा पारोळ
प्रति व्यवस्थापक कर्तव्य ट्रस्ट यांस सप्रेम नमस्कार, मी संदीप पाटील जि. प. शाळा मेढे मुख्याधापक व केंद्राच्या वतीने आपल्या ट्रस्टचे हार्दिक अभिनंदन व आभार. आपला अतिशय स्तुत्य उपक्रम मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी मोलाची भर टाकणारा असून त्यांना आनंददायक असा आहे असेच उपक्रम भविष्यात अपेक्षित आहेत. All the best for your future.

जि. प. शाळा मेढे
कर्तव्य चॅरिटेबल ह्यांनी मुलींसाठी आज जे काही उपक्रम आनंदाने करून घेतले त्यात मुलींना खूप मजा आली आणि आम्हाला हि खूप आनंद झाला खूप काही शिकण्यासारखे मिळाले, खूप खूप धन्यवाद!

विजया पाटील

प्रति व्यवस्थापक कर्तव्य ट्रस्ट यांस सप्रेम नमस्कार, दिनांक १३/०४/२०१८ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळा शिरोळे ता. भिवंडी च्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन कि आपण असा उपक्रम राबवत आहेत. खेड्यापाड्यात पोहचणे मुश्किल अशी तरी तुम्ही आमच्या आश्रमशाळेत येऊन असा कार्यक्रम राबवला या बद्दल खूप खूप धन्यवाद.

सौ. थोरात

मुख्याध्यापिका
जय महाराष्ट्र कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट शैक्षणिक क्षेत्रात मोलाचा हातभार लावत आहे. त्यांच्या या कार्याला आणि सामाजिक बांधीलकिला आमच्या शुभेच्छा.

प्रशांत महाडिक

कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आपला २८/०२/२०१९ रोजी खोज हा कार्यक्रम सर्व मुला मुलींच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने फारच महत्वाचा आणि चांगला आहे. सर्वजणांना आपल्या उपक्रमात सहभागी करून घेतले त्यामुळे सर्वानाच प्रेरणा मिळाली आपण आजपर्यंत एकूण ७६ कार्यक्रम घेतले असेच पुढे हि घेत राहाल या साठी शुभेच्छा.

गोसावी बी.जि

जि. प. शाळा पनवेल, रायगड.
प्रति मा. व्यवस्थापक कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट अंधेरी पूर्व, मुंबई. आज दिनांक २८/०२/२०१९ गुरुवार रोजी श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय वावने तालुका पनवेल, जिल्हा रायगड या विद्यालय मध्ये सकाळी १०.०० पासून इयत्ता ५वी ते १०वी च्या विद्यार्त्यांसाठी विविध क्षेत्रातील प्रावीण्यास पात्र असणारे विद्यार्थी शोधण्यासाठी अनेक उपक्रम राबवले त्या उपक्रमातून गुणवत्ता धारक विद्यार्त्यांना खूपच छान बक्षिसे देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवून प्रोत्साहित केले. आम्हाला याचा आनंद होत आहे आणि कौतुक वाटत आहे कि आपण आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्त्यांपर्यंत पोहचून त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्याचा प्रयत्न करीत आहात. आणि विशेष म्हणजे आपण आज हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी जे प्रतिनिधी पाठवले आहेत त्यांनी सकाळी आल्यापासून तहान-भूक हरपून अगदी तल्लीन होऊन एकजीवाने व विद्यार्त्यांशी एकरूप होऊन सर्व उपक्रम यशस्वीपणे राबिवले अगदी कार्यक्रम संपेपर्यंत उत्साही व प्रसन्न राहून कर्तव्य ट्रस्ट चे मॅनेजर खुशबू गोयल आणि त्यांच्या सर्व सहकारी यांना धन्यवाद. आमच्या विद्यार्त्यांसाठी सर्वात मोठे बक्षिस म्हणजे एका मुलाला व एक मुलीला सायकल देऊन त्यांच्या ४ किलोमीटर प्रयन्ताचा पायी प्रवास त्यांनी खूप आनंदी केला अशाच प्रकारच्या समाजातील गरजू विद्यार्त्यांना शैक्षणिक गरजा पुरवण्यात मदत केल्यास निश्चितच ग्रामीण भागातील लपलेले कलागुण बाहेर येऊन त्यांच्या जीवनाला योग्य मार्ग मिळेल. अशीच आपल्या ट्रस्ट च्या माध्यमातून समाजसेवा होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना.

पिसे आर.आर

शिक्षक, वावने विद्यालय

Student

HVPS Law College, Ghatkopar West, Mumbai

Professor

HVPS Law College, Ghatkopar West, Mumbai

Farooq

Principal, Girls High School, Jogeshwari West, Mumbai

Student

HVPS Law College, Ghatkopar West, Mumbai

Mr Yashwant A Kadam

Social Worker, Dombivali

Mr. Naresh D. Shedge

Teacher, MADHYAMIK VIDYALAY VAGHOSHI, RAIGAD

Mr. Shivaji More

DIRECTOR Forward Classes, Dombivli West

Mr. Sujit G Jagtap

Teacher, G.B.Vader High School, Pali, Raigad

Mr. Thomas Michael

Volunteer, America

Mrs Khan Farhat Irfan Ahmed

Head Mistress, Mohammadi Urdu High School, Bhandup (W)

Mrs Tabassum Mam

Principal, IQRA URDU SCHOOL, Bhiwandi

Mrs. Samrudhi More

Trustee, Dnyan Prasarak Shikshan Sanstha, Vikhroli (E)

Raj Ajay Madi

Beneficiary, G.B.Vader High School, Pali, Raigad

Mr. D.r. Singh

Principal, Gayatri Vidya Mandir Bhandup (W)

Mr. M. N. Mahatre

Founder & Trustee, Amarkor School Bhandup (w)

Mrs. Manisha C. Bari

Principal, Vikaswadi Prathamik Shala Dhanu